मुंबई, दि. 7 : कायम विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाचा निर्णय दोन दिवसात घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना आज दिले.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर अनुदान देण्यात येईल अशी घोषणा विधिमंडळ अधिवेशनात करण्यात आली होती. शाळा सुरु होण्यास 10 दिवसांचा अवधी असताना अद्यापही अनुदान घोषित न झाल्यामुळे सुमारे 12 हजार शिक्षकांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री श्री. तावडे यांच्या पुढाकाराने सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, गृह (शहरे) राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, आमदार रामनाथ मोते, ना.गो. गाणार, अनिल सोले,सुधाकर कोहळे, भगवानराव साळुंखे, विकास कुंभारे, मिलिंद माने,श्रीमती संगीता ठोंबरे आदींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सर्व संबंधित आमदारांनी आपल्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मांडणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वित्तमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना यासंदर्भात पुढील दोन दिवसात निर्णय घोषित करण्याचे सांगितले आहे.
No comments:
Post a Comment