उल्हासनगर प्रौढ प्रशिक्षण संस्थेत कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 June 2016

उल्हासनगर प्रौढ प्रशिक्षण संस्थेत कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू

मुंबई दि ३१ - अपंग कल्याण आयुक्तालयाच्या अधिनस्त असलेल्या उल्हासनगर येथील प्रौढ मूकबधीर प्रशिक्षण संस्थेमध्ये 2016-17 या वर्षासाठी औद्योगिक प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०१६ आहे.


या प्रौढ मूकबधीर प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रौढ कर्णबधीर विद्यार्थ्यांना निवास व भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात येते. या संस्थेमध्ये जोडारीकामसुतारकामतारतंत्री या विभागांमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 1 जुलै 2016 रोजी वयाची सोळा वर्षे पूर्ण केलेल्या आणि 45 वर्षाच्या आतील आणि ६ वी उत्तीर्ण झालेल्या प्रौढास या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेता येणार आहे. प्रवेश अर्जाचे वाटप विनामूल्य करण्यात येत असून संबंधितांनी अधीक्षकप्रौढ मूकबधीर प्रशिक्षण संस्थाशांती भवनगांधी रोडनिजधाम आश्रमासमोर,तहसीलदार कार्यालयाजवळउल्हासनगर-५जिल्हा ठाणे येथे संपर्क साधावा. अर्ज व्यक्तीश: किंवा टपालाद्वारे दिनांक ३० जून २०१६ पर्यंत स्वीकारण्यात येतील. अधिक माहितीसाठी     0251-2522382 या क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी आणि संस्थेच्या अधीक्षकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad