मुंबई / प्रतिनिधी 13 June 2016
मुंबई महानगरपालिकेच्या शिवडी येथील टीबी रुग्णालयात रुग्णाना इस्कोन संस्थेमार्फ़त जेवण पुरवले जाते. त्यासाठी पालिका इस्कोनला निधी देते. परंतू इस्कोनमार्फ़त जेवण पुरवण्यासाठी जी गाडी वापरली जाते त्यावर सुमन रमेश तुलसियानी ट्रस्ट कडून जेवण पुरवठा केले जात असल्याचा ब्यानर लावला जातो. तसेच रुग्णाना वेळेवर जेवण मिळत नाही. जेवण चांगले असले तरी ते वेळेवर उपलब्ध होत नसेल तर त्याचा काय फायदा ? असा प्रश्न आरोग्य समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. पालिका पैसे देत असताना इस्कोनकडून पालिकेचे नाव ब्यानरवर वापरले जात नसल्याने आरोग्य समितीच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. इस्कोनच्या कारभारावर आरोग्य समिती सद्स्यानी आक्षेप घेतल्याने इस्कोन रुग्णाना वेळेवर जेवण पुरवत नसेल, पालिकेचे नाव ब्यानरवर वापरत नसेल तर इस्कोनवर कारवाई करून त्यांचे कंत्राट रद्द करण्यात यावे असे आदेश आरोग्य समिती अध्यक्ष प्रशांत कदम यांनी दिले.
Post Top Ad
13 يونيو 2016
Home
Unlabelled
रुग्णाना वेळेवर जेवण न दिल्यास इस्कोनचे कंत्राट रद्द होणार
रुग्णाना वेळेवर जेवण न दिल्यास इस्कोनचे कंत्राट रद्द होणार
الاشتراك في:
تعليقات الرسالة (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق