मुंबई / प्रतिनिधी - दादर पोर्तुगीज चर्चच्या सिग्नलच्या मधोमध अचानक बंद पडलेल्या ट्याक्सीचा स्फोट एका महिलेच्या जागरूक पणामुले होण्यापासून वाचला आहे.
सोमवारी दुपारी 12.30 च्या सुमारास प्रभादेवी येथे राहणार्या 35 वर्षीय लिना देसाई आपल्या मुलाला शालेतून आणण्यासाठी प्रभादेवी येथून दादर कबूतर खाना येथे निघाल्या होत्या. त्या पोर्तुगीज चर्च जवळ आपल्या स्कूटीहुन पोहचल्या असता एक वयस्कर ट्याक्सी चालक आपल्या ट्याक्सी बाहेर उभा होता. ट्याक्सी सिग्नल जवळ मधोमध उभी होती. ट्याक्सीतून मोठा धुरही येत होता. ट्याक्सी चालक सिएनजी ग्यास बंद करण्याचा प्रयत्न करत होता. परंतू त्याला ग्यास बंद करता येत नव्हता.
हा प्रकार लोक पाहत होती परंतू त्याला मदत करत नव्हते. लिना देसाई यांनी हा प्रकार बघून त्या ट्याक्सी चालकाच्या मदतीला धावल्या. पण त्यांनाही डिक्कीमधील सिएनजी ग्यास बंद करायला जमले नाही. ट्याक्सीच्या सिटला आग लागली होती. ही आग सिएनजी ग्यास पर्यंत पोहचली असती तर मोठा स्फोट झाला असता. याची जाणीव ठेवून देसाई यांनी लोकाना आग विझवण्यासाठी विनंती केली. त्या रस्त्यावर मोठ मोठ्याने मदतीसाठी हाकाही मारू लागल्या.
अखेर 5 तरुणानी पुढे येवून आग विझवण्यासाठी मदत केली. पाउस जोरात सुरु होता पावसाचे रस्त्यावर जमा झालेल्या पाण्याचा उपयोग करुन ट्याक्सीच्या सिटला लागलेली आग विझवण्यात आली. त्यामुले सिएनजीचा स्फोट होण्यापासून वाचला . मात्र या घटनेमुले देसाई याना आपल्या मुलाला शालेतुन आणायला एक तास उशीर झाला.
No comments:
Post a Comment