पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 June 2016

पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून

मुंबई / प्रतिनिधी – येत्या १८ जुलैपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीन आठवडे म्हणजे ५ ऑगस्टपर्यंत चालणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिली. या अधिवेशनात आठ अध्यादेश, मागील तीन विधेयके, दोन नवीन विधेयके मांडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर विधान परिषदेचे सभापती व उपसभापतींची निवड करण्यासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक विधान भवनात झाली. त्यामध्ये अधिवेशन कालावधी व कामकाजाबाबत निर्णय झाला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad