मुंबई, दि. 20 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात चालू आठवड्यात एकूण 40 हजार 748 कामे सुरु असून, या कामांवर 6 लाख 93 हजार 272 इतकी मजूर उपस्थिती आहे.
मागील आठवड्यापेक्षा 4 जून 2016 रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये मजूर उपस्थितीत घट झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त घट बीड, चंद्रपूर, वाशिम, लातूर, नंदूरबार,सातारा, गडचिरोली, नांदेड, उस्मानाबाद, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये झाली असून गोंदिया, भंडारा, परभणी,औरंगाबाद, अकोला या जिल्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. राज्यामध्ये एकूण 4 लाख 18 हजार 336 इतकी कामे शेल्फवर ठेवण्यात आली आहेत. यामध्ये मजूर क्षमता 1,244.93 लाख इतकी आहे. एकूण शेल्फवरील कामांपैकी 3 लाख 15 हजार 725 कामे ग्रामपंचायतीकडे आणि उर्वरीत 1 लाख 2 हजार 611 कामे यंत्रणेकडे आहेत.
No comments:
Post a Comment