दिल्ली दि 23 - उत्तर प्रदेश विधानसभेतील विरोधीपक्षनेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी बसपाचा त्याग केला असल्याने त्यांनी आता रिपब्लिकन पक्षात यावे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष उत्तर प्रदेशात ताकदीने उभा करण्यासाठी स्वामी प्रसाद मौर्य यांच्या सारख्या वरीष्ट नेत्याचे रिपाइंमध्ये सन्मानाने स्वागत करण्यात येईल असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते खासदार रामदास आठवले यांनी केले आहे
उत्तर प्रदेशात बसपामध्ये स्वामी प्रसाद मोर्या यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे माहामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर समर्पित भावनेने काम करणारे उत्तर प्रदेशातील ते वरिष्ठ वजनदार नेते आहेत बसप प्रमुख मायावती या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची हत्या करीत आहेत असा आरोप करून मोर्या यांनी बसप चा त्याग केला आहे उत्तर प्रदेशातील दलित बहुनांच्या हितासाठी मौर्या यांचा बसप ला सोडचिट्ठी देण्याचा निर्णय योग्य आहे त्यांचे रिपब्लिकन पक्षात सन्मानाने स्वागत करण्यात येईल असे सांगत खासदार रामदास आठवले यांनी स्वामी प्रसाद मौर्या यांना रिपाइंत प्रवेश करण्याची ऑफर दिली रिपाइंचे उत्तर प्रदेशातील नेते सतत स्वामी प्रसाद मौर्या यांच्या संपर्कात असल्याचे खासदार रामदास आठवले यांनी सांगितले
No comments:
Post a Comment