मुंबई दि. २७ : आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सर्व शासन निर्णयांचा तसेच MPLADS Guidelines, होणाऱ्या कामांची व्याप्ती आणि कार्यपद्धतीचा अभ्यास करून अधिक गतिमान पद्धतीने कामे होण्याकरिता तसेच यासंबंधीचे अंतिम निर्णय घेण्यासाठी वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीमध्ये सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील,सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत आणि वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आमदारांनी सुचवलेली कामे करण्याकरिता असलेल्या सर्व समावेशक मार्गदर्शक सूचना अद्ययावत करून त्याअंतर्गत होणाऱ्या कामांची व्याप्ती आणि कार्यपद्धतीचा अभ्यास ही मंत्रिमंडळ समिती करील तसेच ही कामे गतिमान पद्धतीने होण्यासाठी अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला असतील. नियोजन विभागाने यासंबंधीचा शासननिर्णय दि. २१ जून २०१६ रोजी निर्गमित केला आहे.
No comments:
Post a Comment