हेपॅटायटिसच्या रुग्णांमध्ये २५ टक्के तर टायफॉईडच्या रुग्णांमध्ये ५ टक्के वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 June 2016

हेपॅटायटिसच्या रुग्णांमध्ये २५ टक्के तर टायफॉईडच्या रुग्णांमध्ये ५ टक्के वाढ

मुंबई / प्रतिनिधी / 6 June 2016 - पावसाळ्यानंतर दूषित पाणी आणि अन्नामुळे होणाऱ्या हेपॅटायटिस आणि टायफॉईड या आजारांचे प्रमाण यंदा पावसाळ्याआधीच वाढले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पाच महिन्यांतच हेपॅटायटिसच्या रुग्णांमध्ये २५ टक्के तर टायफॉईडच्या रुग्णांमध्ये ५ टक्के वाढ झाली आहे. 

२०१५ मध्ये हेपॅटायटिसचे १ हजार १८४ रुग्ण आढळले होते. यंदा जानेवारी ते मे दरम्यान ६५७ रुग्ण आढळले आहेत. टायफॉईडचे गेल्यावर्षी १ हजार ३२४ रुग्ण आढळले होते. तर, यंदा आजपर्यंत ५७९ रुग्ण आढळले आहेत. गेल्यावर्षी लेप्टोच्या रुग्णांची संख्या अचानक वाढली होती. त्यामुळे यंदा लेप्टोला आळा घालण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. प्रत्येक वॉर्डमधील प्राण्यांची व्हेटर्नरी डॉक्टरकडून तपासणी करण्याची आणि लसीकरणा मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचबरोबर तबेला मालकांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी दिली.
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेने धूर फवारणीला सुरुवात केली आहे. २७ वॉर्डमध्ये फवारणी सुरू आहे. झोपडपट्टी भागात अडगळीत टाकलेल्या वस्तू, टायर यांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. खासगी मालकीच्या ३ हजार ६१८ पाण्याच्या साठ्यांची तर, महापालिका जागांमधील २ हजार ४०६ पाण्याच्या साठ्यांची तपासणी करण्यात आली आहे. कोणत्याही ठिकाणी साचलेले पाणी अथवा अडगळ आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे कुंदन यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad