कांउन्टर इन्सर्जन्सी ॲन्ड अँन्टी टेररिस्ट स्कूल स्थापन करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 June 2016

कांउन्टर इन्सर्जन्सी ॲन्ड अँन्टी टेररिस्ट स्कूल स्थापन करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई / प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांना नक्षलविरोधी व दहशतवादविरोधी लढ्यामध्ये समर्थपणे भूमिका बजावण्यासाठी सुराबर्डी(नागपूर) येथील अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्रात कांउन्टर इन्सर्जन्सी ॲन्ड अँन्टी टेररिस्ट स्कूल स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. 


जंगल टॅक्टीस, फिल्ड क्रॉम्प्ट, जंगल फिल्ड, मॅप रिडींग, शस्त्र हाताळणी, दहशतवाद व नक्षलवाद विरोधी मोहिमा आदी विषयामध्ये राज्यातील पोलीस अधिकारी  आणि कर्मचाऱ्यांना पारंगत करण्यासाठी कांउन्टर इन्सर्जन्सी ॲन्ड अँन्टी टेररिस्ट स्कूल कार्यरत राहणार आहे.  याबाबत केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. त्यानुसार पूर्णपणे राज्यशासनाच्या अखत्यारीत असलेले हे विद्यालय विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान, नागपूर) यांच्या अधिपत्याखालील कार्यरत होईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad