रेल्‍वे प्रवाशांना झालेल्‍या त्रासाची चौकशी करा - अॅड आशिष शेलार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 June 2016

रेल्‍वे प्रवाशांना झालेल्‍या त्रासाची चौकशी करा - अॅड आशिष शेलार

मुंबई / प्रतिनिधी दि. 22 – मुंबईत पावसाला सुरूवात होताच गेले काही दिवस रेल्‍वेची उपनगरीय सेवा विविध कारणास्‍तव विस्कळीत होत असल्‍याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. याप्रकणी तात्‍काळ मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी रेल्‍वे मंत्री सुरेश प्रभू यांची आज दिल्‍ली येथे जाऊन भेट घेतली. रेल्‍वे मंत्री सुरेश प्रभू एकिकडे प्रवाशांच्‍या सेवेचा दर्जा सुधारण्‍याचा प्रयत्‍न करीत असताना रेल्‍व्‍ेा प्रशासनाच्‍या चुकांमुळे, अधिका-यांच्‍या दिरंगाईमुळे जर प्रवाशांचे हाल होत असतीतील तर अशा अधिका-यांची चौकशी करण्‍यात यावी, अशी मागणी आमदार अॅड आशिष शेलार यांनी रेल्‍वेमंत्र्यांकडे केली.


रेल्‍वेने प्रशासनाने पावसाळयापुर्वी खबरदारीच्‍या उपाययोजना केल्‍या आहेत. तरीही  पावसाला सुरूवात होतानाच हलक्‍याशा पावसाने गेले दोन दिवस रेल्‍वेचे वेळापत्रक विस्‍कळीत झाले होते . रेल्‍वे अधिकारी जरी कामे केली असे सांगत असले तरी प्रत्‍यक्षात प्रवाशांचेही हाल होत आहेत. काल मध्‍य प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. जे. जे. हॉस्पिटलकडे निघालेल्‍या एका माहिलेची प्रसुतीही रेल्‍वे गाडीतच झाली. तर माहीम रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या विद्युत उपकेंद्रातील बॅटरी बॉक्स चोरीला गेल्याचा फटका आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला बसला. त्‍यामुळेही प्रवाशांचे हाल झाले. तसेच गेल्‍या आठवडाभरात हर्बर आणि मध्‍ये रेल्‍वेच्‍या ओव्हरहेड वायर तुटल्याचे प्रसंग वारंवार घडत असून तांत्रिक बिघाडामुळे रेल्‍वेचा वारंवार खोळंबा होत आहे.

याप्रकरणी आज मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी तात्‍काळ दिल्‍ली येथे जाऊन रेल्‍वे मंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणी चौकशी करावी. तसेच रेल्‍वे अधिकाऱयांना पावसाळयात आपत्‍कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्‍याचे निर्देश देण्‍यात यावेत.ज्‍या ठिकाणी दरड कोसळणे किंवा पाणी साचण्‍याची शक्‍यता आहे, अशा ठिकाणी खरबदारीच्‍या उपायोजना करण्‍यात याव्‍यात, तसेच आप्‍त्‍कालीन परिस्थिती निर्माण झाल्‍यास प्रवशांना वेळीच सुचना देण्‍यात याव्‍यात. काही उपनगरीय रेल्‍वे स्‍टेशनवर फलांटांच्‍या दुरूस्‍तीची व ब्रिजची कामे सुरू आहेत ती लवकरात लवकर पुर्ण करावीत. तर संपुर्ण मान्‍सून  पुर्व तयारीचा रेल्‍वेच्‍या वरिष्ठ अधिका-यांनी फेर आढावा घेऊन त्‍याचा अहवाल रेल्‍वे मंत्रालयाने मागवून घ्‍यावा. त्‍यानंतरही प्रशासनाच्‍या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना त्रास सहन करवा लागला तर त्‍याची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिका-यांची चौकशी करून कारवाई करावी, अशा विविध मागण्‍या करीत रेल्‍वे मंत्र्यांशी आमदार अॅड आशिष शेलार यांनी रेल्‍वे प्रवशांच्‍या समस्‍यांबाबत चर्चा केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad