मुंबई / प्रतिनिधी - कुलाबा येथील मेट्रो हाउसला काल ( 2 जून 2016 ) दुपारी 2 वाजून 57 मिनिटांनी लागलेली आग आज ( 3 जून 2016 ) दुपारी 12 वाजून 15 मिनिटानी पूर्णपणे विझवण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे. दरम्यान आगीनंतर शुक्रवारी ( 3 जून 2016 ) म्हाडाने ही इमारत सील केली असून इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची नोटीस म्हाडाने इमारत मालकाला बजावली आहे. तसेच स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत या इमारतीमध्ये लोकांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
आगीनंतर इमारत खाली करण्यात आली आहे. इमारत जुनी व लाकडी बांधकामामुळे आगीत इमारत पूर्णपणे खिळखिळी झाली आहे. त्यामुळे मालकाने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी नोटीस म्हाडाने पाठवली आहे. नोटीस मिळाल्यानंतर मालकाने चार दिवसात ऑडिटच्या प्रक्रियेला सुरुवात करावी व त्याच्यापुढील आठवडाभरात ऑडिट पूर्ण करावे असे, नोटीसीमध्ये नमुद केले आहे. इमारतीमध्ये १० रहिवाशी आणि ५० व्यावसायिक गाळेधारक आहेत. या सर्वांना ऑडिट झाल्याशिवाय इमारतीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. ही इमारत सेस असली तरी खासगी असल्याने इमारतीचे ऑडिट होईपर्यंत येथील रहिवाशी व व्यावसायिकांना राहण्याची तात्पूरती सोय त्यांनाच करावी लागणार आहे.
या आगीमधे बी विंगच्या तिसर्या मजल्यावरील छताचा भाग आणि जीने दुसर्या मजल्यावर कोसळले तसेच मजल्यावरील रेडीमेड कपडे, व्यावसायिक स्टोर, जीना इलेक्ट्रिक मीटर दुकाने क्याबिन जळाले आहेत. पहिल्या मजल्यावरील रेडीमेड कपडे आणि तीसर्या मजल्यावरील इलेक्ट्रिक वायरिंग, फर्नीचर लाकडी सामान सीलिंग फ्यान एसी किचन मधील सामान याचे आगीत नुकसान झाले आहे. या आगीमधे सहाय्यक केंद्र अधिकारी रोटे हे जखमी झाले असून त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
No comments:
Post a Comment