पंडित मदनमोहन मालविय शताब्दी महापालिका रुग्णालयात क्षयरोग नियंत्रणासाठी नवीन बाह्यरुग्ण विभाग कार्यान्वित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 June 2016

पंडित मदनमोहन मालविय शताब्दी महापालिका रुग्णालयात क्षयरोग नियंत्रणासाठी नवीन बाह्यरुग्ण विभाग कार्यान्वित

बृहन्मुंबई महानगरपालिका व एमएसएफ यांचा संयुक्त उपक्रम
मुंबई / प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिका व सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय मानवतावादी संघटना मेडीसिन्स सॅन्स फ्रंटीयर्स/ डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स (एमएसएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने एम/पूर्व विभागातील गोवंडी येथे पंडित मदनमोहन मालविया शताब्दी महापालिका रुग्णालयात क्षयरोगाच्या नवीन बाह्यरुग्ण विभागाचे (OPD) लोकार्पण स्थानिक आमदार तुकाराम काते आणि नगरसेवक दिनेश पांचाळ यांच्या हस्ते आज (दिनांक १५ जून, २०१५) करण्यात आले.


महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.  पद्मजा केसकर या कार्यक्रमास उपस्थित होत्या. या संयुक्त उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट्य मुंबईतील एम/पूर्व (गोवंडी) विभागासारख्या क्षयरोगाचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या विभागातील क्षयरोग लागण, मृत्यूदर आणि संक्रमण आटोक्यात आणणे, हे आहे.

शहर क्षयरोग अधिकारी डॉ. दक्षा शाह यांच्या मते, ‘सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत मार्च २०१६ मध्ये औषध संवेदनशील चाचणी (DST) नुसार उपचाराची पद्धत कार्यान्वित केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने जून २०१६ पासून औषध संवेदनशील चाचणीनुसार उपचाराची पद्धत मुंबईच्या ए ते जी विभाग अश्या ७ जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित केली आहे. ही पद्धती मुंबईच्या इतर जिल्ह्यांमध्ये क्रमाक्रमाने राबविण्यात येणार आहे. एमएसएफ बरोबर भागीदारीने काम केल्याने एम/पूर्व (गोवंडी) सारख्या विभागात नवीन मार्गदर्शक तत्वानुसार क्षयरोगाचे त्वरित निदान होण्यासाठी उपचार पद्धती कार्यान्वित करणे सोपे होईल.’

हे नवीन बाह्यरुग्ण विभाग शताब्दी रुग्णालयाच्याच आवारात आणि स्वतंत्र परिसरात उभारण्यात आले आहे. संसर्ग नियंत्रणाचे सर्व नियम येथे काटेकोरपणे पाळण्यात येणार आहेत. एमएसएफचे कार्यक्रम समन्वयक बेकी वेल्फेअर यांच्या मते, औषध संवेदनशील चाचणीनुसार  उपचाराच्या पद्धतीची अंमलबजावणी मुंबईत झपाट्याने होणे गरजेचे आहे. क्षयरोगाचे त्वरित निदान आणि उपचाराची प्रभावी अंमलबजावणी हे समाजात क्षयरोगाचा प्रसार न होण्याची गुरुकिल्ली आहे. हा उपक्रम या विभागातील रुग्णांना चांगल्या सुविधा पुरविण्याची एक नामी संधी आहे, याचा महापालिका प्रशासनाला विश्वास आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad