विविध मागण्यांसाठी सफाई कामगारांचा आज मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 يونيو 2016

विविध मागण्यांसाठी सफाई कामगारांचा आज मोर्चा

मुंबई / प्रतिनिधी / ९ जून २०१६  - 
मुंबई महानगर पालिकेत सफाई कर्मचारी आपल्या  प्रलंबित  मागण्यांसाठी  शुक्रवारी दादर येथील गौतम नगर ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र सफाई कामगार सेनेचे अध्यक्ष खेमचंद सोलंकी यांनी दिली.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते बोलताना म्हणाले कि , सफाई कामगार म्हणून मेहत्तर , रुखी , भंगी , मेघवाल , वाल्मिकी व इतर जातींमधील लोक मोठ्या प्रमाणात काम करतात . सदर समाज हा गुजराती भाषिक आहे. , महाराष्ट्र आणि गुजरातचे विभाजन होण्या आधीपासून हे सर्व जण मुंबईत स्थायिक आहेत , परंतु जातीचे प्रमाणपत्र देताना राज्य सरकारने १९५० सालचा वास्त्यव्याचा पुरावा सादर करण्याची अट  घातलेली आहे. १९६० मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचे विभाजन झाल्याने १९५० सालचा महाराष्ट्रातील वास्त्यव्याचा पुरावा मिळणे कठीण आहे. या कारणास्तव जातीचे प्रमाणपत्र या समाजातील विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने शालेय आणि महाविद्यालयीन प्रवेश मिळत नाहीत असे सोलंकी यांनी सांगितले . तसेच महापालिकेमध्ये काम करणाऱ्या सफाई कामगाराला सेवा सदनिका मालकी तत्वाने देण्यात यावी  व त्यानंतरच सदर जागेचा विकास करावा तसेच जात प्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी मोर्चाचे आयोजन केल्याचे सोलंकी यांनी सांगितले .

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Post Bottom Ad