नगरसेवक मकरंद नार्वेकर विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
मुंबई 28 june 2016 - कुलाबा मार्केटच्या बाजूला असणारा पालिकेचा दवाखाना आणि वाचनालय एका इसमाने स्थानिक नगरसेवक मकरंद नार्वेकर यांच्या पाठिंबाने बळजबरिने ताब्यात घेतला आहे. पालिकेने उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. पण विधान परिषदेचे माजी सभापति रामराजे निबांळकर यांच्या दबावामुळे दोन वर्ष झाली तरी न्यायालयात केस उभी राहु शकलेली नाही, असा आरोप कांग्रेसचे माजी नगरसेवक विनोद शेखर यांनी केला आहे.
कुलाबा मार्केटच्या बाजूला असणारा दवाखाना आणि वाचनालय हे 500 ते 700 चौरस फुट मध्ये असून एक मजली इमारती आहे. या दवाखानाचा आणि वाचनालयाचा फायदा येथील स्थानिक नागरिकांना होत असे.
म्हाडा तर्फे दवाखाना आणि वाचनालयाच्या डागडूजीचे काम 2008 मध्ये हाती घेतले गेले. डागडूजीचे काम पूर्ण झाल्यावर 2014 मध्ये पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी इमारत आपल्या ताब्यात घेण्यास गेले असता, येथील एक इसम, पारस जैन याने दवाखाना आणि वाचनालय ताब्यात घेण्यास पालिकेला मज्जाव केला. यावेळी स्थानिक नगरसेवक नार्वेकर यांनी ही पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना धमकी देत पालिकेला इमारत ताब्यात घेऊ दिली नाही. या प्रकरणी पालिकेने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पण जैनने जामीन मिळविला. त्यामुळे पालिकेने उच्च न्यायालयात धाव घेतली. पण दोन वर्ष उलटून ही अद्याप न्यायालयात केस उभी राहलेली नाही.
दरम्यान, याच वर्षी मे महिन्यात पालिकेच्या विधी विभागाने संबंधित प्रकरणी स्थानिक नगरसेवक नार्वेकर यांचे नाव एफआयआर मध्ये का नाही असा मुद्दा उपस्थित करत प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे, अशी माहिती कांग्रेसच्या नगरसेविका सुषमा शेखर यांनी दिली. नगरसेवक नार्वेकर यांनी केलेले कृत्य हे अनुचित नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विनोद शेखर यांनी केली आहे. पण निंबाळकर हे नार्वेकर यांच्या भावाचे सासरे असल्यानेच ते पालिकेच्या कारवाई मध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप शेखर यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment