याचिकेवर चार आठवड्यांत उत्तर देण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
मुंबई : लोकांच्या जिवाला धोका ठरणाऱ्या पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांना मारून टाकावे, या याचिकेवर चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकार तसेच मुंबई महानगर पालिकेला गुरुवारी दिले.
सांगलीचे मारुती हाले यांच्या मुलाचा पिसाळलेला कुत्रा चावल्याने मृत्यू झाला. त्यामुळे त्यांनी नुकसानभरपाई व महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ मधील कलम ४४ ची अंमलबजावणी, यासाठी याचिका दाखल केली. त्याची सुनावणी न्या. व्ही.एम. कानडे व न्या. एम.एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न निर्बीजीकरणाने सुटणार नाही. त्यासाठी एकमताने तोडगा काढणे आवश्यक असल्याचे खंडपीठाने म्हटले. धोकादायक व पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांना संपवण्याचा अधिकार पोलिसांना आहे,’ असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांचे वकील मनोज शिरसाट यांनी खंडपीठासमोर केला. न्यायालयाने या याचिकेचे रूपांतर जनहित याचिकेत केले. या समस्येवर तोडगा काढण्याची गरज आहे, असेही न्यायालयाने म्हटले.
No comments:
Post a Comment