प्रतिसाद, पोलीस मित्र ॲपचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 June 2016

प्रतिसाद, पोलीस मित्र ॲपचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

पुणेदि. 15 -  महिला आणि रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रतिसाद ॲपपोलीस मित्र महाराष्ट्र ॲप आणि वाहन चोरीची तक्रार तत्काळ नोंदविता यावी यासाठी वाहन चोरी तक्रार वेबसाईटचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.


राज्य राखीव पोलीस दलाच्या बल गट क्रमांक दोन येथील सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेगृहराज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदेमहापौर प्रशांत जगतापआमदार माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते.
पोलीस विभागात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि नागरिकांना तत्काळ सेवा उपलब्ध करून मिळाव्यात यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जावा,अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्मार्ट पोलिसिंग ही कल्पना साकारू शकेल,असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षितपोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. ही विविध ॲप्स विकसित करणाऱ्या व्यक्तिंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad