मुंबई, दि. 22 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेऊन नवीन कामांच्या प्रस्तावांची यादी 5 जुलैपर्यंत सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री विनोद तावडे यांनी आज दिल्या. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री विनादे तावडे यांच्या अध्यक्षतेखाली चेतना महाविद्यालय, वांद्रे येथे घेण्यात आली. समुद्र किनाऱ्यालगतच्या मार्गाबाबत (कोस्टल रोड) चे सादरीकरण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यावेळी करण्यात आले. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांचे हाँप आन हाँप (HOHO Bus) बस बाबतचे सादरीकरणही यावेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन धन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना, अटल पेन्शन योजना,प्रधानमंत्री मुद्रा योजना या विविध योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. म्हाडा, एमएमआरडीए, एसआरए व महापालिका यांच्या संबंधित विविध विकासकामे व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समस्या व सूचना यावर यावेळी चर्चा करण्यात आली.
या बैठकीस गृह निर्माण मंत्री प्रकाश महेता, मुंबई महापालिकेच्या महापौर स्नेहल अंबेकर, खासदार गजानन किर्तीकर, गोपाळ शेट्टी, किरीट सोमय्या, हुसैन दलवाई, आमदार भाई गिरकर, अनिल परब, अतुल भातखळकर, कपिल पाटील, नसीम खान, श्रीमती तृप्ती सावंत, मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता, एमएमआरडीएचे आयुक्त यु. पी. एस. मदान, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह,एमएमआरडीचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, म्हाडाचे उपाध्यक्ष एस. एस. झेंडे, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन आदींसह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment