आंबेडकर भवन पाडल्याप्रकरणी दादरमध्ये मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 June 2016

आंबेडकर भवन पाडल्याप्रकरणी दादरमध्ये मोर्चा

- भीमसैनिकांकडून वाहने, दुकानांची झाली मोडतोड
मुंबई । प्रतिनिधी 28 June 2016
मुंबईतील चळवळीचे केंद्र असलेले आंबेडकर भवन रविवारी पहाटे गुपचूपपणे जमीनदोस्त केल्या प्रकरणी राज्याचे माहिती आयुक्त व पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे सल्लागार रत्नाकर गायकवाड तसेच त्यांच्या इतर सहकारी ट्रस्टींना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना आणि मुंबईतील डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी भोईवाडा पोलीस स्टेशनवर मोठा मोर्चा काढला.

दादर पूर्व येथून या मोर्चास सुरुवात झाली. मोर्चामध्ये सुमारे हजारो कार्यकर्ते सहभागी होते. नवी मुंबई आणि ठाणे परिसरातून कार्यकर्ते मोर्चासाठी आले होते. रत्नाकर गायकवाड यांना अटक करा, फडणवीस सरकार मुर्दाबाद, पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टीचा धिक्कार असो, अशा घोषणा मोर्चामध्ये दिल्या जात होत्या. यावेळी मोर्चातल्या भीमसैनिकांनी रस्त्यावर दिसेल त्या गाड्या आणि दुकानांची जोरदार मोडतोड केली.

मोर्चाचे नेतृत्व रिपब्लीकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आणि त्यांचे बंधु भीमराव आंबेडकर यांनी केले. भारिप, रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते मुंबईत धोधो पाऊस असूनही मोर्चात मोठ्या संख्येने सामील झाले होते. येत्या दोन दिवसात पीपल्सच्या ट्रस्टींना अटक नाही झाली, तर आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवण्यात येईल, असा इशारा आनंदराज आंबेडकर यांनी भोईवाडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad