मुंबई / अजेयकुमार जाधव 1 June 2016
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या जागावरून भाजापाने जाहिर केलेल्या उमेदवारावरून वातावरण तापू लागले आहे. एकीकडे बाहेरून आलेल्या उमेदवाराना विधान परिषदेवर पाठवले जाणार असल्याने पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी नाराज असताना आता आम आदमी पार्टीच्या प्रीती शर्मा मेनन यांनी पार्टी विथ डिफरंस म्हणनारी हीच भाजपा का असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रीती मेनन यांनी भाजपावर आरोपाची सरबत्ती केली. भाजपाने प्रवीण दरेकर यांना उमेदावर म्हणून घोषित केले आहे. याच दरेकर यांच्यावर मुंबई बँकेच्या 123 करोड़ रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. त्यांच्या संचालक मंडळाकडून 260 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करायची अजुन बाकी आहे. दरेकर यांनी भाजपामधे प्रवेश केल्यावर त्यांच्यावरील भर्ष्टाचाराची चौकशी बंद असल्याचे मेनन यांनी सांगितले.
कोंग्रेसचे माजी मंत्री असलेल्या कृपाशंकर सिंग यांचे निकटवर्तीय आर. एन. सिंग यानीं रत्नागिरी मधे एका मृत व्यक्तीची 105 एकर जमीन 5 लाख 85 हजार रुपयाना खरेदी केली आहे. ही जमिन ज्या व्यक्तीची आहे तो व्यक्ति मृत असताना त्याच्या जागी दुसराच व्यक्ति उभा करून ही जमिन आर. एन. सिंग आणि कृपाशंकर सिंग यांच्या पत्नीच्या नावे केली. सरकारकडून 350 बंदुकीची लायसंस देण्यात आली. त्यापैकी 102 लायसंस आर. एन. सिंग यांच्या बीआयएस सिक्युरिटी एजंसीला देण्यात आले होते असे प्रिती मेनन यांनी सांगितले.
आर. एन. सिंग यांनी उत्तर भारतीय संघ या संस्थेवर आपल्या नातेवाईकाना नियुक्त केले असून या संस्थेद्वारे उत्तर भारतीय लोकांवर आपला दबाव ठेवला जातो तसेच सिंग यांच्याकडून या संघटनेच्या संपत्तीचा वापर केला जात आहे. येणार्या निवडणूकीमधे उत्तर भारतीय मते मिळवण्याचा प्रयत्न असू शकतो असा संशय प्रिती मेनन यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीमधून भाजपामधे आलेले प्रसाद लाड यांच्याबाबत मेनन यांनी प्रश्न उपस्थित करून भ्रष्ट लोकांना उमेदवारी दिल्याने मेनन यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपा नेहमी सर्वांपेक्षा वेगळा पक्ष असल्याचा ओरड करत असतो. भाजपा त्यांच्या पक्षातील चांगले उमेदवार देइल अशी अपेक्षा असताना इतर पक्षातील भ्रष्ट लोकांना उमेदवारी देवून भाजपा दूसरी कोंग्रेस असल्याचे सिद्ध केल्याचे मेनन यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात अनेक क्षेत्रात चांगले उमेदवार भाजपाला जर चांगले उमेदवार मिळत नसतील तर आम्ही चांगले उमेदवार शोधून देवू असे आवाहान प्रिती मेनन यांनी केले.
No comments:
Post a Comment