बेस्ट समिती सभेत सदस्यांची मागणी
मुंबई / प्रतिनिधी 30 june 2016 : बेस्ट मध्ये सध्या कार्यरत असलेल्या ट्रायमेक्स कंपनीच्या तिकीट इश्यूइंग मशीनमध्ये प्रचंड त्रुटी असून ह्या मशीन वारंवार नादुरुस्त होत असल्यामुळे फुकट्या बेस्ट प्रवाशांचे फावत असून, ह्या मशीन मुळे बस वाहकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागते. त्यामुळे ट्रायमेक्स कंपनीला हद्दपार करावे तसेच ऑगस्ट मध्ये ट्रायमेक्स कंपनीचे कंत्राट संपत असून त्यांना मुदतवाढ देऊ नये. अशी मागणी बेस्ट सर्वपक्षीय सदस्यांनी केली.
बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी ट्रायमेक्स कंपनीच्या तिकीट मशीन बद्दल दोन महिन्यांपूर्वी ठरावाची सूचना मंडळी होती. ही तिकीट इश्यूइंग मशीन वारंवार नादुरुस्त होत आहेत. बस प्रवर्तनामध्ये असताना अचानक मशीन नादुरुस्त झाल्यास बस वाहकांना पूर्वीच्या पद्धतीनुसार निकिट बंधामधील टाकी बसप्रवाशांना वितरित करावे लागते, त्या बंधामध्ये एकाच प्रशाला तीन ते चार तिकीट द्यावे लागत असल्याने पंच करण्यास वेळ लागतो. त्यामुळे अधिकाधिक प्रवाशी तिकीट न काढताच उतरतात. त्यामुळे बेस्टचे आर्थिक नुकसान होत असल्याची बाब निदर्शनास आणली.
बेस्ट समिती सदस्य सुहास सामंत यांनी तर ह्या तीकीट इश्यूइंग मशीनच्या त्रुटीमुळे बस वाहकांना कशा प्रकारे त्रास सहन करावा लागतो याचा पाढा वाचला आजवर बेस्टच्या २७ आगारांमध्ये ९३३० तिकीट मशीन देण्यात आल्या आहेत. त्याची बॅटरी खुपच कमी चालते, त्यामुळॆ मध्येच मशीन बंद पडल्यास तिकीट बाहेर न येणे, अडकून पडणे, दोनदा तिकीटाची नोंद घेणे असे प्रकार घडतात. अशावेळी ते तिकीट देताना त्या बस प्रवाशाचे नाव व फोन नंबर घेण्याचे बंधनकारक केल्यामुळे बस वाहकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते, हे न केल्यास त्या बसवाहकाला स्वतःच्या खिशातील पैसे उपक्रमास भरावे लागतात असे निदर्शनं आणले. तसेच बेस्टने सादर इश्यूइंग मशीन च्या नादुरुस्ती माहीती बद्दल माहिती ही त्या कंपनीकडून घेतलेली असल्याने ती चुकीची अस्ल्याचे निदर्शनास आणले.
तर कॉंग्रेसचे रवी राजा यांनी ह्या मशीन पाच वर्षांपासून वापरात असल्याने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. तसेच ट्रायमेक्स कंपनीचे कंत्राट ऑगस्ट रोजी संपत असल्याने त्याला मुदतवाढ देण्यासाठी बेस्टमधूही काही अधिकारी आग्रही असल्याचे निदर्शनास आणले, म्हणून ऑगस्टला दोन महिने असतानाही अजूनही प्रक्रिया सुरू केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे आयत्या वेळी दोन महिन्यानंतर ट्रायमेक्स कंपनीला मुदतवाढ देण्यात यावी, असा प्रस्ताव बेस्ट समितीकडे पाठवणार व मंजूर करून घेण्यात येईल. अशा ट्रायमेक्स कंपनीला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी रवी राजा यांनी केली.
No comments:
Post a Comment