विमानतळ परिसरात सर्वेक्षणाचा प्रयत्न हाणून पाडला जाईल - शालिनी ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 June 2016

विमानतळ परिसरात सर्वेक्षणाचा प्रयत्न हाणून पाडला जाईल - शालिनी ठाकरे

मुंबई : अंधेरी पूर्वेकडील सहार येथील विमानतळ प्राधिकरणाच्या हद्दीत राहणाऱ्या लाखो झोपडीधारकांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनाबाबत प्रशासनाचे नेमके धोरण काय आहे? हे जोपर्यंत स्पष्ट होणार नाही, तोपर्यंत या परिसरात प्रशासनाकडून केला जाणारा सर्वेक्षणाचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे पक्षाच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी यासंदर्भात उपनगर जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांची भेट घेत रहिवाशांच्या समस्यांना वाचा फोडली आहे.

येथील तलाव पाखाडी रोड क्रमांक ३ वरील सुमारे ३०९ एकर जमिनीवर पसरलेल्या झोपडपट्टीतील २.५ लाख झोपडीधारकांचे सर्वेक्षण करण्याबाबतच्या नोटीस येथे लावण्यात आल्या आहेत. या झोपडपट्टी परिसराचा विस्तार अंधेरी पूर्व, कुर्ला, विलेपार्ले, कलिना विधानसभेतील महापालिकेच्या २२ प्रभागांमध्ये झाला आहे. मात्र प्रशासनाकडून येथील रहिवाशांवर स्थलांतरणासाठी दबाव टाकला जात आहे. परिणामी न्याय मिळावा म्हणून रहिवाशांनी मनसेशी संपर्क साधल्यावर पक्षाच्या शिष्टमंडळाने उपनगर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये संजय चित्रे, नगरसेवक दिलीप लांडे, संदीप दळवी, शरद सावंत, वीणा भागवत, विभाग अध्यक्ष सुहास शिंदे, ज्योती अंधारे, रवी इंदुलकर, सुप्रिया पवार, दीपक रावराणे, वीरेन जाधव, प्रमोद म्हसकर, अभिषेक सप्रे, नयना कनल यांचा समावेश होता. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad