मुंबई 21 June 2016 - आरे कॉलनीत उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेबाबत संजय निरुपम यांनी केलेले आरोप अपुर्या माहितीच्या आधारे असल्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी स्पष्ट केले आहे. राजकीय आकसापोटीच त्यांनी हे आरोप केल्याचे वायकर यांनी सांगितले.
आरे वसाहत, गोरेगाव(पुर्व) येथील स्थानिक नागरिकांच्या व मॉर्निग वॉकला जाणार्या जनतेच्या मागणीनुसार व शासनाच्या विविध योजनांसाठी उपलब्ध असलेल्या व जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने असलेल्या निधीतून आरेमध्ये व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. आरे प्रशासनाने या व्यायमशाळेस रितसर परवानगी दिल्यानंतरच निर्धारित जागेत मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या माध्यमातून शासनाची रितसर परवानगी घेऊन ही व्यायामशाळा बांधण्यात आली.
आरे वसाहातीमध्ये म्हाडा किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून सामाजिक वापराकरीता बांधण्यात आलेल्या वास्तुंचे क्षेत्रङ्गळ आरे प्रशासन काही ठिकाणी निश्चित करुन देते. सदर व्यायामशाळेसाठी दिलेल्या ना हरकत पत्रामध्ये क्षेत्रङ्गळाचा उल्लेख नाही. परंतु सदर वास्तुचे बांधकाम हे अंदाजे ४ गुंठ्यापेक्षा कमी जागेमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी २० एकर जागा असल्याचा केलेला आरोप निबनुडाचा आहे.
परंतु सदर ठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा उद्देशाने नागरिक त्याचा उपयोग करीत असून कोणत्याही प्रकारच्या वाणिज्य स्वरुपात वापर होत नाही. सध्या सदर ठिकाणचे व्यवस्थापन सद्या ‘शिवसमर्थ शिक्षण प्रसारक संस्था’ या संस्थेच्या माध्यमातून होत असून सदर संस्था १९९४ पासून शासन मान्यताप्राप्त नोंदणीकृत आहे व तिचे लेखापरिक्षण नियमाप्रमाणे पुर्ण करण्यात आल्याचे वायकर यांनी स्पष्ट केले आहे.
अशा प्रकारच्या सुविधा निर्माण करुन देण हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कामे विविध ठिकाणी करण्यात आली आहेत. परंतु सदर वास्तु ह्या पुर्णपणे शासनाची मालमत्ता असते आणि तिचा वापर जनहितार्थ होणे अपेक्षितच आहे. त्यानुसार येथे कला, क्रीडा व सांस्कृतिक या सुविधेबरोबरच गोरगरीब, निराधार नागरिकांना मोङ्गत अन्नछत्रासारखा उपक्रमही राबविण्या येतो. या व्यायामशाळेवर माझा कुठलाही मालकी हक्कच असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे संजय निरुपम यांनी केलेले सर्व आरोप राजकीय आकसापोटी व बिनबुडाचे असल्याचा आरोप वायकर यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment