इकोला विषाणु प्रकरणी मुंबईमधील एका बर्फाच्या कारखान्यावार जप्तीची कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 June 2016

इकोला विषाणु प्रकरणी मुंबईमधील एका बर्फाच्या कारखान्यावार जप्तीची कारवाई

मुंबई / प्रतिनिधी 13 June 2016
इकोला विषाणु पासून मुंबईकर नागरिकांना वाचवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसली असून इकोलाचा प्रसार करणाऱ्या बर्फाच्या कारखान्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईमधील एका कारखान्यावार जप्तीचीही कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिकेचे आरोग्य समिती अध्यक्ष प्रशांत कदम यांनी दिली.


पालिकेच्या आरोग्य समितीच्या सदस्या डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी बैठकीत इकोलाबाबत पालिकेने काय कारवाई केली असा प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईमधे इकोलामुले कोलरा, ग्यास्ट्रो सारखे आज़ार होत असल्याने बर्फाच्या कारखान्यावर कोणती कारवाई केली याची माहिती समितीला द्यावी अशी मागणी केली. यावर पालिकेने 13 बर्फाच्या कारखान्या पैकी 5 कारखान्यावर कोर्टामार्फ़त कारवाई केली. या कारखान्याना पालिका पाणी पुरवठा करते. पालिका खाण्याचा किंवा इतर कामासाठीचा वेगळा बर्फ बनवा असे सांगत नाही.
बर्फ बनवताना स्वच्छता राखण्याच्या सूचना पालिका देत असते. बर्फाचा ट्रे, बर्फ वाहून नेताना चांगली सुविधा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतू पालिकेच्या सूचनांकड़े दुर्लक्ष केले जात असल्याने साथीचे रोग पसरत असल्याचे पालिकेने स्पष्ठ केले. पालिकेने मुंबईमधे असलेल्या 13 बर्फाच्या कारखान्याची पाहणी पालिकेने केली. यापैकी 5 कारखाने दोषी आढ़ळले त्यावर 394 कलमानुसार कारवाई करण्यात आली. 5 पैकी 4 कारखान्यावर कोर्टामार्फ़त नोटीस बजावून कारवाई करण्यात आली आहे. तर पी उत्तर येथील शकुंतला नावाच्या कारखान्यामधील सर्व साहित्य जप्तीची कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाद्वारे स्पष्ट करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad