दाभोलकर हत्या प्रकरणी सनातनच्या डॉक्टर वीरेंद्र तावडेला अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 June 2016

दाभोलकर हत्या प्रकरणी सनातनच्या डॉक्टर वीरेंद्र तावडेला अटक

मुंबई : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयने पनवेलमधील डॉक्टर वीरेंद्र तावडे याला संशयावरून अटक केली आहे. दाभोलकर हत्या प्रकरणातील ही पहिलीच अटक असून हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता असलेल्या तावडे याचा सनातन संस्थेशी संबंध असल्याचा संशय आहे.

याबाबत सीबीआयचे अधीक्षक एस. आर. सिंग म्हणाले, शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सीबीआयच्या मुंबई येथील कार्यालयात चौकशीसाठी बोलावले असताना त्याला अटक करण्यात आली. गेल्या आठवडय़ात सीबीआय न्यायालयाच्या विशेष न्यायधीश बांगड यांनी तावडे याच्या घराच्या झडतीची परवानगी दिली होती. त्यात काही संशयास्पद वस्तू, कागदपत्रे आणि ब:याच गोष्टी सापडल्या. यावरून तावडे याला अटक करण्यात आली आहे.  शनिवारी त्याला पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात येईल. वीरेंद्रसिंह तावडे हा कान-नाक-घसा तज्ज्ञ आहे. त्याचा पनवेलजवळील कळंबोली येथे दवाखाना आहे. पनवेलजवळील सनातनच्या आश्रमाजवळच कल्पतरू सोसायटीमध्ये घर आहे. 1 जून रोजी सीबीआयने पुण्यातील सारंग अकोलकर आणि तावडे यांच्या घरांवर छापे टाकले होते. यामध्ये काही संशयास्पद वस्तूंबरोबर त्याचा लॅपटॉपही जप्त करण्यात आला होता. तसेच अकोलकर आणि तावडे यांच्यात ई-मेलवरून संपर्क असल्याचे दिसून आले होते. छाप्यानंतर सीबीआयकडून तावडे याला चौकशीसाठी बोलावण्यातही येत होते.

गेली 17-18 वर्षे तो हिंदू जनजागरण समितीशी संलग्न आहे. तो या संस्थेचा पश्चिम महाराष्ट्राचा प्रमुख होता, तसेच कोल्हापूरचा समन्वयक म्हणूनही त्याने ही जबाबदारी पार पाडली आहे. त्याने डॉ. दाभोलकर यांच्याविरोधात अनेकदा मोर्चेही काढले होते. त्याची पत्नी बालरोगतज्ज्ञ असून तीही हिंदू जनजागरण समितीशी संलग्न आहे. दाभोलकर हत्येनंतर पोलिसांनी जारी केलेल्या रेखाचित्रंशी त्याचा चेहरा मिळताजुळता नसला तरी, डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा कट रचण्यात याचा हात होता, असा संशय आहे. गोव्यातील बॉम्बस्फोटप्रकरणी आधीपासूनच राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) रडारवर असलेल्या आकोलकरच्या पुण्यातील घरासह पनवेलमधील तावडे आणि देवद आश्रमावर सीबीआयने छापे टाकून घराची झडती घेतली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad