जीव मुठीत घेऊन बचाव कार्य करणाऱ्या अग्निशमन दलातील जवानांसोबत दुजाभाव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 June 2016

जीव मुठीत घेऊन बचाव कार्य करणाऱ्या अग्निशमन दलातील जवानांसोबत दुजाभाव

मुंबई / प्रतिनिधी - दुर्घटनांची माहिती मिळताच जीव मुठीत घेऊन प्रत्यक्ष घटनास्थळी बचावकार्य करतात ते अग्निशमन दलातील जवान. चोख सेवा बजावणा-या या जवानांना प्रोत्साहन भत्त्यापोटी फक्त ५०० रुपये मिळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तर घटनास्थळी बाहेर उभे राहून फक्त सूचना करणा-या अधिका-यांना तब्बल पाच हजार रुपये प्रोत्साहन भत्त्यापोटी मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकाच सेवेत कार्य करत असताना हा दुजाभाव का, असा सवाल कर्मचारीवर्गाकडून उपस्थित होत आहे.

आग लागली, झाड पडले, रस्ता खचला, इमारत अथवा इमारतीचे छत कोसळले, झाडावर कावळा अडकला तर पहिली फोनची घंटा वाजते ती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाची. आपत्कालीन परिस्थितीची माहिती मिळताच आहे त्या परिस्थितीत जवान घटनास्थळी रवाना होतात आणि बचावकार्यास सुरुवात करतात. जीवावर उदार होऊन कर्मचारी आपली सेवा चोख बजावतात. अनेक वेळा तर दुस-याचा जीव वाचवताना कर्मचा-यांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र या कर्मचा-यांच्या सुरक्षेकडे अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कर्मचा-यांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad