मुंबई / प्रतिनिधी - बेस्ट प्रशासन 100 खाजगी बसेस भाड़े तत्वावर घेणार आहे. खाजगी बसेसच्या माध्यमातून बेस्टमधे खाजगीकरण केले जाणार असल्याचा आरोप करत याविरोधात बुधवारी 8 जून रोजी दुपारी 3 वाजता वडाला डेपो येथे निदर्शने करण्यात येतील अशी माहिती बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बेस्ट आर्थिक संकटात असल्याने बेस्टने खाजगी 100 बसेस भाड़ेतत्वावर घेण्याचे जाहिर केले आहे. या बसेस वर खाजगी चालक असणार आहे. या बस मालकाना वर्षाला एक रुपये दराने शिवाजी नगर, देवनार, मालवणी आगरातील भूखंड देणार आहे. या भुखंडावर सोयी सुविधा आणि समांतर यंत्रणा उभारण्यात येणार आहे. प्रतीदिन बस मालकाला 200 किलोमिटरची हमी देण्यात येणार आहे. खाजगी बस चालकाना देण्यात येणार्या दरामधे दरवर्षी पाच टक्क्यानी वाढ देण्यात येणार आहे. मात्र या खाजगी बसेसचा प्रवासीकर मात्र बेस्ट भरणार असल्याने बेस्ट कर्मचारी मात्र उध्वस्त होणार आहे. बेस्ट कर्मचारी उध्वस्त होणार असल्याने कर्मचार्यांमधे तीव्र संतापाची भावना आहे. यामुले बुधवारी बेस्टच्या वडाला डेपोत 8 जूनला दुपारी आंदोलन करणार आहे. या आंदोलना नंतर पुढील दिशा ठरवली जाणार आहे. वेळ पडल्यास रत्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा इशारा शशांक राव यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment