पालिकेच्या दाव्या नंतरही मुंबईत पाणी साचलेच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 June 2016

पालिकेच्या दाव्या नंतरही मुंबईत पाणी साचलेच

1 मृत 2 जखमी, 102 झाडे कोसळली
मुंबई / प्रतिनिधी दि. २१ जून 
मुंबईमधे पावसाळयात पाणी साचणार नाही असा दावा पालिकेने केला असताना पावसाची सुरुवात होताच मुंबईमधे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने पालिकेने केलेला दावा फोल ठरला आहे. सोमवारच्या रात्री पासून मंगळवारी सकाळ पर्यंत 102 ठिकाणी झाडे कोसळल्याच्या, 22 ठिकाणी शोकसर्किट झाल्याच्या तर एका ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली. यात एकाचा मृत्यु झाला असुन दोघे जखमी झाले आहेत.


मुंबईमधे 20 जून ते 21 जून रोजी सकाळी 8.30 ते 8.30 या 24 तासात कुलाबा येथे 110 मिमी तर सांताक्रुझ येथे 107 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या 24 तासात 62 ठिकाणी झाडे कोसळण्याच्या तर 20 ठिकाणी शोर्टसर्किटच्या घटना घडल्या. मुंबई शहरात मस्जिद, बापु खोटे स्ट्रीट, भारतीय विद्या भवन, पूर्व उपनगरात आंबेडकर नगर, पंत नगर, कुर्ला टर्मिनस, पश्चिम उपनगरात ओबेराय मोल, पश्चिम द्रुतगाती मार्ग, वाकोला पूल अश्या 8 ठिकाणी पाणी साचले होते. पाण्याचा निचरा करणारे पंप वापरून पाण्याचा निचरा करण्यात आला आहे.

मुंबईत 5 ठिकाणी घराच्या भिंती आणि घराचा भाग पडल्याच्या घटना घडल्या. काळबादेवी निलकमल होटेल समोर बैठे बांधकाम खचले यात हिरालाल शाह हे इसम अडकले होते. शहा यांची अग्निशमन दलाच्या जवानानी सुटका करून त्यांना जीटी रुग्णालयात दाखल केले आहे. सायन प्रियदर्शनी येथे इलेक्ट्रिकचा शोक लागून जनर्पा घाटकर (45) जखमी झाले. त्याना सायन रुग्णालयात उपचारासाठी नेले असता घाटकर याना मृत घोषित करण्यात आले. दिंडोशी राजीव गांधी नगर येथे दरड कोसळली यात आझाद पठाण शेख (30) हे जखमी झाले. शेख याना शताब्दी रुग्णालयात आयसीयूमधे दाखल करण्यात आले. तर 21 जून रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 2 पर्यंत 40 झाडे कोसळली असून 2 शोकसर्किटच्या घटना घडल्या आहेत मात्र यात कोणीही जखमी झालेले नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad