मुंबई / प्रतिनिधी - कालबादेवी येथील आगीवेळी मुंबईच्या अग्निशमन दलातील 4 वरिष्ठ अधिकारी गमावन्याची वेळ दलावर आली होती. अशीच वेळ कुलाबा येथील मेट्रो हाउस आगीवेळी अग्निशमन दलावर आली असताना प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदले यांनी योग्य वेळी घेतलेल्या योग्य निर्णयामुले अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांचे मोलाचे जिव वाचले आहेत.
कालबादेवी आगीमधे प्रमुख अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांच्या सोबत चार जणाना आपला जिव गमवावा लागला होता. या आगीच्या घटनेवेळी इमारतीचा भाग कोसळला होता. या कोसळलेल्या भागाखाली सर्व अधिकारी अडकून आगी मधे होरपळून निघाले होते. अशीच घटना कुलाबा येथील मेट्रो हाउसच्या आगीवेळी घडणार होती. परंतू या आगी मधून फायरमन आणि मुख्य अग्निशमन अधिकारी यांचा जिव वाचला आहे.
मेट्रो हाउसला दुपारी 2.57 ला आग लागली. या इमारतीमधे ए बी सी अश्या तीन विंग असून ए विंग 5 मजली तर बी आणि सी विंग 4 मजली आहे. मेट्रो हाउसच्या बी विंगला आग लागली होती. वाऱ्याच्या वेगाने आग सर्वत्र पसरत चालली होती. इमारतीमधे लाकडी दादर आणि छतावर असलेले डांबर यामुले आग पसरत चालली होती. अग्निशमन दलाचे जवान आगीशी झुंज देत होते. दुसऱ्या मजल्यावर आग पसरली तेव्हा जवान, फायर अधिकारी आणि मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदल़े आग विझवत होते.
तिसर्या मजल्याचा जिन्याला आगीची झळ लागली. त्याच वेळी तेथून बाहेर पडण्याचा निर्णय रहांगदल़े यांनी घेतला. फायर जवान आणि अधिकारी तिथून बाहेर पडताच सपूर्ण जिना आणि छताचा भाग कोसळला. अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकारी याठिकाणी आग विझवत राहिले असते तर अनेक अधिकारी आणि जवान मृत्युमुखी पडले असते. परंतू योग्यवेळी घेतलेल्या निर्णयामुले अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवानांचे लाख मोलाचे प्राण वाचले आहेत.
No comments:
Post a Comment