मुंबई, दि. 24 : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस 26 जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, मुंबई शहर यांच्यामार्फत सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून दि. 26 जून 2016 रोजी सायन येथील वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात सकाळी 10.00 वा. कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तसेच दि. 26 जून रोजी आतंराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनदेखील साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातून सर्वसाधारण गुणवत्ता यादीत प्रथम आलेल्या मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना अर्थसहाय्य योजनेतंर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटप केले जाणार आहे. या दिवसानिमित्त निबंध स्पर्धा/वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून स्पर्धेनंतर कार्यक्रम ठिकाणी विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, मुंबई शहर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment