पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – रामदास कदम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 June 2016

पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – रामदास कदम

मुंबई दि. 6  पर्यावरणाचे संतुलन राखले तर सर्वांचे आयुष्य सुखी होईल. त्यासाठी पर्यावरणाचे संतुलन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची  जबाबदारी  आहे, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानेदोन दिवसीय सृष्टीमित्र स्पर्धा पारितोषिक वितरण व पर्यावरण विषयक वसुंधरा लघुचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अन्बलगनपर्यावरण विभागाचे संचालक बी.एन. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

            
कदम म्हणाले कीपर्यावरणाचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे. पर्यावरणाच्या रक्षणामुळे प्रदूषणावर नियंत्रण राहील आणि प्रदूषण विरहित जीवन जगता येईल. तसेच,शासन आणि  प्रशासन  एकाच रथाची दोन चाके आहेत.  शासन आणि प्रशासन यांनी समन्वयाने कार्य केले तर विकासाचा वेग अधिक गतीने वाढतो असे सांगून श्री. कदम म्हणाले की, प्रदूषण नियंत्रण मंडळातील कर्मचारी दीर्घकालीन शासनाची  सेवा करतात परंतुत्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळत नाही. हा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असूनयाबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल आणि यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी  दिले.
            
पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील म्हणाले कीहा सोहळा कौटुंबिक असून25 वर्षे शासनाची सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना एक वेगळाच आनंद आहे.  कर्मचाऱ्यांनी महामंडळाची दीर्घ सेवा करून प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. सेवानिवृत्तीनंतरही सर्वांनी  पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दरम्यानप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 25 वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांचा गौरव सत्कार आणि अभिव्यक्ती सृष्टीमित्र मंडळाच्या पुस्तिकेचे प्रकाशन2015 साली घेण्यात आलेल्या स्पर्धेच्या विजेत्यांना पुरस्कार वितरण पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी मुंबई महानगरपालिका परिमंडळ घाटकोपर यांच्या सौजन्याने सुरू केलेल्या भीमाशंकर परिसर विकास प्रतिष्ठान संचलित सायकल परिसर सेवेचे उद्घाटनही करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad