मुंबई / प्रतिनिधी - मुंबईमधे पार्किंगचे नियोजन करण्यासाठी पे एंड पार्क कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतू अश्या कंत्राटदारानी पालिकेची फसवणूक केल्याने माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेने राज इंटरप्रायजेस व ग्लोबल पॉवर सिस्टम या कंत्राटदाराना पे एंड पार्किंगचे कंत्राट दिले होते. या कंत्राटदाराना पार्किंगसाठी नेमून दिलेल्या जागेवर ठरवून दिलेल्या दरात पार्किंग सुविधा द्यायची होती. परंतू हे दोन्ही कंत्राटदार ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारात होते. त्यांनी पालिकेला दिलेले चेक बाउंस झाले होते. राज इंटरप्रायजेसने 1 करोड़ 49 लाख व ग्लोबल पॉवर सिस्टमने 2 करोड़ 38 लाख रुपयाची थकबाकी पालिकेकड़े जमा केलेली नव्हती. यामुले पालिकेने या दोन्ही कंत्राटदाराना काळ्या यादीत टाकुन माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी मो़. आबिद जब्बार अली, असगर अलीला अटक करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment