मुंबई, दि. 13 : खादीची लोकप्रियता वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणामध्ये दि.14 व 15 जून दरम्यान खादी व ग्रामोद्योगी वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 11ते सायंकाळी 6 या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार असून उद्या सकाळी 12 वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
राज्यात खादी तसेच ग्रामोद्योगाच्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना खादीचे कपडे वापरण्याचे आवाहन केले असून राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. खादीच्या वस्त्रांबद्दलची माहिती नागरिकांना व्हावी,यासाठी खादीच्या कपड्यांचा प्रसार व प्रसिद्धी व्हावी तसेच ग्रामोद्योगाच्या वस्तूंची लोकप्रियता वाढावी यासाठी मंडळाच्यावतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात 25 स्टॉलधारक सहभागी होणार असून त्यात खादीचे कपडे, महाबळेश्वर येथील सेंद्रीय मध, हातकागद, अमरावती येथील सोलर चरख्यावरील सूत कताई, मूर्तीकला, हस्तकला,आयुर्वेदीक उत्पादने यांचा समावेश असणार आहे. या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रिचा बागला यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment