मुंबई- म्हाडाच्या मुंबई मंडळाद्वारे मुंबईच्या विविध भागातील ९७२ घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. नोंदणी अर्ज भरत घरासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दोन-तीन दिवसातच हजारो अर्जदारांच्या उडया पडल्या आहेत. २४जूनपासून घरासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत ८००० हून अधिक अर्जदारांनी घरासाठी अर्ज केला असून त्यापैकी ९००हून अधिक अर्जदारांनी ऑनलाईन अनामत रक्कम भरत सोडत प्रक्रियेत आपला प्रवेश निश्चित केला आहे.
म्हाडाच्या सोडत संकेतस्थळावर २३ जून रोजी दुपारी २ वाजल्यापासून अर्जदारांसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली. तर २४ जूनपासून घरासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची तसेच ऑनलाईन आणि डीडीद्वारे अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत १५००० हून अधिक अर्जदारांची यशस्वी नोंदणी झाली.
अर्जामध्ये फोटो योग्यरित्या अपलोड न केल्याने तसेच पॅन क्रमांक चूकीचा टाकल्याने ८००हून अधिक अर्जदारांच्या नोंदणी रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या अर्जदारांची नोंदणी यशस्वीरित्या झाली असेल तेच अर्जदार घरासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. रविवारी सायंकाळपर्यंत ८०००हून अधिक अर्जदारांनी घरासाठी अर्ज भरला असून त्यापैकी ९००हून अधिक अर्जदारांनी ऑनलाईनद्वारे अनामत रक्कम भरत सोडत प्रक्रियेत आपला प्रवेश निश्चित केला आहे.
२३ जूनपासून सुरू झालेली ऑनलाईन नोंदणी पक्रिया २३ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत चालणार असून २४ जूनपासून सुरू झालेली ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत चालणार आहे. म्हाडाद्वारे १० ऑगस्ट रोजी घरांची सोडत काढली जाणार आहे.
No comments:
Post a Comment