मुंबई दि. ९
मुंबईत वीज वितरण करणाऱ्या बेस्ट, रिलायन्स इन्फ्रा आणि टाटा पॉवर या तीन्ही कंपन्यांच्या वीजदरात समानता आणून मुंबई करांना समान वीजदर लागू करण्यात यावत. तसेच वीज वितरण कंपन्यांचे (CAG) ऑडीट करण्यात यावे अशी मागणी करीत बुध्वारी रात्री उशिरा मुंबई भाजपा अध्यक्ष अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील भाजपा आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबई प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी दिली.
मुंबईतील वीज दरांबाबत भाजपाच्या भूमिकेची माहिती देण्यासाठी आज झालेल्या पत्रकार परिषदेला मुंबई भाजापा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार, गटनेते मनोज कोटक आणि भालचंद्र शिरसाट उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबईला बेस्ट, रिलायन्स इन्फ्रा आणि टाटा पॉवर या तीन कंपन्यांसह भांडूप, कांजूरमार्ग या भागात महावितरणतर्फे वीजपूरवठा केला जातो. या सर्व कंपन्यांचे विज दर हे वेगळे असून रिलायन्सचे दर सर्वाधिक आहेत. त्यामुळे मुंबईकरांवर अन्याय होत असून याबाबत विजग्राहकांमध्ये असंतोष दिसून येत आहे.
२०१६ -१७ च्या वर्षासाठी बेस्ट रिलायन्स इन्फ्रा आणि टाटा पॉवर यांनी एमएआरसी ला सादर केलेल्या प्रस्तावित दराच्या प्रस्तावात समानता नसल्याची माहिती आता उघड झाली आहे. ० ते १०० युनिटसाठी बेस्ट चा दर ३.३८ रू. तर रिलायन्सचा दर३.३९ आणि टाटा चा दर ४.२४ एवढा प्रस्तावित करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रस्तावात टाटाचे वीजदर सर्वाधिक असून बेस्ट च्या तुलनेत सुमारे २ रूपयांपर्यंतची तफावत असल्याचे प्रसिध्द झालेल्या बातम्यातून जनतेसमोर आल्याने मुंबईक्रांमध्ये तीव्र नाराजी दिसून येते आहे.
बेस्ट समितीचे अध्यक्षपद भाजपाकडे आल्यानंतर बेस्टच्या वीज दरात कपात करण्याचा विचार झाला आहे. जर मुंबई बेटावरील ग्राहकांना बेस्ट सर्वात कमी दरात वीज पुरवठा करत असेल तर, मग अन्य कंपन्यांना ते का शक्य होत नाही? अशी भावना आता उपनगरातील रिलयन्स आणि टाटा च्या वीज ग्राहकांमध्ये दिसून येते आहे. त्यामुळे आपण या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून मुंबईतील सर्व वीज ग्राहकांना समान विजदर लागू करावेत. तसेच विज वितरण करणाऱ्या खाजगी कंपन्यांचे ऑडीट (CAG ) करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनामार्फत आम्ही आपल्याकडे करीत आहोत.
या शिष्टमंडळामध्ये भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा, राज पुरोहीत, योगेश सागर, अतुल भातखळकर, मनिषा चौधरी, पराग अळवणी, राम कदम, भाई गिरकर, सरदार तारासिंग, अमित साटम, भारती लवेकर, कॅप्टन सेल्वन यांचा समावेश होता.
No comments:
Post a Comment