मुंबईत लेप्टो, मलेरिया, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 June 2016

मुंबईत लेप्टो, मलेरिया, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले

मुंबई / प्रतिनिधी - मुंबईमध्ये गॅस्ट्रो, लेप्टो, हेपेटायटीस आणि मलेरियाचे रुग्ण वाढत असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून सिद्ध होत आहे. जून महिन्यात गॅस्ट्रोचे 539, मलेरियाचे 280, हेपेटायटीसचे 82, टायफॉईडचे 29, डेंगीचे 28 आणि लेप्टोचे सहा रुग्ण आढळले. यंदा लेप्टोचे रुग्ण अधिक आढळले आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यात चार रुग्ण आढळले होते. यंदा जूनमध्ये 20 तारखेपर्यंत लेप्टोचे सहा रुग्ण आढळले. दूषित पाण्यामुळे होणारे आजार यंदा मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad