मुंबईतील रस्ते घोटाळा - आणखी पाच जण गजाआड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 June 2016

मुंबईतील रस्ते घोटाळा - आणखी पाच जण गजाआड

मुंबई / प्रतिनिधी -  पालिकेच्या रस्ते घोटाळा प्रकरणात अटकसत्र सुरुच असून कंत्राट कंपनीच्या सुपरवायझर पाठोपाठ आता आणखी ५ साईट इंजिनिअर्स गजाआड करण्यात आले आहेत. पालिकेच्या रस्ते बांधणी घोटाळाप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी सुरुवातीला १० लेखा परीक्षकांना अटक केली. त्यानंतर कंत्राट कंपनीच्या ४ सुपरवायझरना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत याप्रकरणातील आणखी पाच साईट इंजिनिअर्सही दोषी आढळले. 
अमर राजाराम कांबळे (एम/एस रेल्कॉन इन्फ्रा.प्रोजेक्ट लिमिटेडचे ) वेल महाराजन नाडार ( एम.एस रेल्कॉन इन्फ्रा.प्रोजेक्ट लिमिटेड), प्रवीण प्रभाकर पांचाळ ( एम/एस रेल्कॉन आर.के.मधानी कंपनी), दिलीप अशोक राठोड (एम/एस, आरपीएस - के.आर कन्स्ट्रक्शन), विराज पाटील ( एम/एस, महावीर रोड अण्ड इंन्फ्रा.) अशी अटक साईट इंजिनियरची नावे आहेत. अटक आरोपींच्या चौकशीत याप्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता परिमंडळ एकचे उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad