सहा वर्षांत तीन हजार बालमजुरांची सुटका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 June 2016

सहा वर्षांत तीन हजार बालमजुरांची सुटका


मुंबई - महाराष्ट्रासह परराज्यातून आलेले तब्बल चार हजार बालमजुर मुंबईच्या विविध भागांमध्ये काम करत असल्याचे पोलिसांनी प्रथम संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. आले होते. २०१० पासून ते ५ जून २०१६ पर्यंत समाजसेवा शाखेने तब्बल ३ हजार ११७ बालमजुरांची सुटका केली आहे. तर १ हजार ५०६ जणांवर कारवाई केली. जागतिक बाल मजुर दिनानिमित्त मुंबईतून बाल मजुरी हद्दपार करण्याचा विडा मुंबई पोलिसांनी उचलला आहे.

घरकाम, हॉटेल, गॅरेज, जरी, चामडयाचा व्यवसाय, प्लास्टीक मोल्डींगसह विविध लघुउद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर लहान मुलांना राबवून घेतले जाते. कमी पगारात, कमी खर्चात लहान मुलांकडून काम काढून घेतले जाते म्हणून अशा उद्योगांमध्ये प्रौढांपेक्षा बालमजुरांसाठी मालक आग्रही असतात, असा निष्कर्ष समोर आला. मार्च २०१५ मध्ये या कायद्यामध्ये शासनाकडून सुधारणा करत ३७० (१) कलमाचा समावेश करण्यात आला. हे कलम अजामीनपात्र असून यात त्यांना किमान सात वषार्ची शिक्षा होऊ शकते. त्यात जामीनावर सुटण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी मालकांना किमान दोन ते तीन महिने पोलीस कोठडीची हवा खावी लागत आहे. जागतिक बाल मजुर विरोधी दिनानिमित्त मुंबई पोलिसांनी राबविलेल्या अभियानात गेल्या सहा दिवसात १४९ बाल मजुरांची सुटका करण्यात आली. तर याप्रकरणी ९१ गुन्हे दाखल करुन ९४ जणांना अटक करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad