मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांची घेतली भेट...
मुंबई / प्रतिनिधी 30 june 2016
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शिवसेना आमदार व गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या आरे परिसरातील व्यायामशाळेवरील अनधिकृत एक मजला तसेच अंधेरी आणि जोगेश्वरी पूर्व येथील अनधिकृत एसआरए प्रकल्प आणि यातून मिळविलेली बेहिशेबी मालमत्ता या सर्व प्रकरणांची संपूर्ण माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी या संबंधित सर्व कागदपत्रे मुख्यमंत्र्यांना सादर केली.
या बैठकीत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांकडे अशी मागणी केली की, मुख्यमंत्र्यानी ताबडतोब आदेश देऊन व्यायामशाळे वरील अनधिकृत मजला पाडून टाकावा, सर्व अनधिकृत एसआरए प्रकल्प थांबवावेत, जोगेश्वरी गुंफेजवळ १०० मीटरच्या आतील जी बिल्डींग बांधली आहे ती पाडून टाकावी. रवींद्र वायकर यांच्या मंत्री पदाचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून कारवाई करावी.
त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे आश्वासन दिले की, मी या सर्व प्रकरणांची इमानदारीने चौकशी करीन. तुम्ही दिलेली सर्व कागदपत्रे मी आमच्या शासकीय यंत्रणेद्वारे तपासून घेऊन लवकरात लवकर मी निपक्षपातीने योग्य ती कारवाई करीन.
No comments:
Post a Comment