मुंबई / प्रतिनिधी - महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात टाकाऊ अन्नापासून विज निर्मिती करण्याचा प्रकल्प चांगला काम करत असताना शिवडीच्या टीबी रुग्णालयातील ग्यास बनवण्याचा प्रकल्प मात्र रखडणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त आय ए कुंदन यांनी प्रकल्प रखडला असे काही नाही या संदर्भातील कागदपत्रे पाहिल्यावरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.
मुंबई महानगरपालिकेने शिवडीच्या टीबी रुग्णालयात टाकाऊ अन्नापासून ग्यास निर्मिती करण्याचा प्रकल्प राबवण्याचा विचार केला आहे. ग्यास प्रकल्प सुरु करण्यासाठी आजू बाजुच्या होटेलमधील अन्न गोळा केले जाणार होते. दिवसाला होटेल मधील 4 टन कचरा गोला केला जाणार होता. या ग्यासवर रुग्णालयातील स्वयंपाक केला जाणार होता. प्रकल्पामधून निर्माण होणार्या ग्यासमुले रुग्णालयाचे दरमहा 2 लाख रुपये वाचणार होते. तसेच मुंबईच्या डंपिंगमधे महिन्याला 120 टन कचरा टाकण्यापासून वाचला असता.
या प्रकल्पाला 26 मे ला अंतिम स्वरुप दिले जाणार असतानाच काहीनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. टीबी रुग्णालयातील रुग्णांमुले संसर्ग होऊ शकतो. तसाच संसर्ग या ग्यास प्रकल्पातून बनवण्यात येणार्या ग्यास मधून पसरू शकतो. यामुले हा ग्यास हाणीकारक होऊ शकतो अशी भीती वर्तवली गेली आहे. या भीतीमुले महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी एक बैठक घेतली. या बैठकीमधे या प्रकल्पावर चर्चा करण्यात आली. सदर बैठकीमधे प्रकल्पाची सर्व माहिती तपासून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे कुंदन यांनी म्हटले आहे. यामुले शिवडी रुग्णालयात टाकाऊ अन्ना पासून ग्यास बनवण्याचा प्रकल्प रखडणार असल्याची चर्चा आहे.
No comments:
Post a Comment