अंधेरी येथील आगीमधे 8 जणांचा मृत्यु - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 June 2016

अंधेरी येथील आगीमधे 8 जणांचा मृत्यु

अडगळीचा जिना ठरला मृत्यूचे कारण ?
मुंबई / प्रतिनिधी 30 जून 2016
अंधेरी पश्चिम येथील एका मेडिकल स्टोअरला आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामधे 1 पुरुष 2 महिला 2 लहान मुले आणि 3 छोटया मुलींचा होरापलून मृत्यु झाला. तर एक महिला आणि एक फायरमन जखमी झाला आहे. तासभर आगीशी झुंज दिल्या नंतर आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे.


जुहू गल्लीतील दुमजली निगम मेस्त्री चाळीच्या तळमजल्यावर असलेल्या मेडिकल स्टोअरला ही आग लागली आणि काही क्षणांतच आगीचा भडका उडाला. ही आग इलेक्ट्रिक वायरिंग, मेडिकल स्टोअर मधील औषधाच्या स्टारेजला लागली होती. 17 ते 18 लोक या ठिकाणी राहत होते. बाहेर पडण्यासाठी दुकानाच्या आतील अंतर्गत जीना छोटा असल्याने  जिन्यामधे लोक अडकली. हा जिना मेडिकल स्टोअरला लागून होता. आग इतकी भीषण होती की खान कुटुंबियांना बाहेरही पडता आलं नाही. कुटुंबातील आठ जण आगीत होरपळले. या सर्वांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिथे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 

आगीची माहिती मिळताच तीन फायर इंजिन व पाण्याच्या दोन टॅंकरसह अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तासाभरात आटोक्यात आणण्यात यश मिळवलं मात्र, जीवितहानी टाळता आली नाही. मुंबई पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी अशोक दुधे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. साबिया खान (28) ही महिला 45 टक्के भाजली असून तिच्यावर उपचार करण्यासाठी कस्तूरबा रुग्णालयात दाखल केले आहे. तर अविनाश शिरगावकर या फायरमनला दुखापत झाल्याने त्याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
मृतांची नावे
1) सबुरिया मोझिम खान (52)
2) सिद्दीक खान (35)
3) राबिल खान (28)
4) मोझेफ खान (8)
5) उन्नि हाय खान (5)
6) अलिझा खान (4)
7) तुब्बा खान (8)
8) अल्ताझ खान (3 महीने)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad