मुंबई / प्रतिनिधी 29 June 2016
शेतकर्याच्या आत्महत्या थांबवि्ण्यासाठी शेतीमालाला हमीशेतकर्याना हमीभाव देणे आवश्यक आहे. त्यामुले सातवा आयोग लागू करण्यापूर्वी शेतीमालाला हमीभाव द्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुहास राणे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत भाजपाने शेतकऱ्याना हमी भाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकार स्थापन होताच भाजपाने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र देवून हमिभाव देणे शक्य नसल्याचे म्हटले आहे यावरून भाजपाने शेतकऱ्याची फसवणूक केल्याचे भानुसे यांनी म्हटले आहे. सातवा वेतन आयोग लागू केला नाही म्हणून एकही केंद्र सरकारचा कर्मचारी आत्महत्या करणार नाही परंतू शेतकऱ्याला हमीभाव दिले नाही तर शेतकरी आत्महत्या करेल यामुले केंद्र आणि राज्य सरकारने त्वरीत शेतमालाला हमीभाव द्यावा अशी मागणी भानुसे यांनी दिले.
पानसरे, दाभोळकर यांच्या हत्तेमधे सनातन संस्थेच्या कार्यकर्त्याना अटक करण्यात आले आहे. यामुले सनातन संस्थेच्या सर्व पदाधिकार्यांची ओपन नार्को टेस्ट करुन देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भानुसे यांनी केली. सनातनवर कारवाई व्हावी म्हणून तहसीलदार आणि कलेक्टर यांच्या मार्फ़त निवेदने दिली आहेत. याप्रकरणी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे भानुसे यांनी सांगितले.
गोवंश ह्त्याबंदी कायदा शेतकर्यांच्या विरोधात असल्याने हा कायदा त्वरीत रद्द करावा. ज्यांना गोवंश रक्षण करावयाचे असेल त्यांनी म्हातारी झालेली जनावरे पाळावीत असा सल्ला त्यांनी दिला. गरीबाना चांगले शिक्षण मिळावे म्हणून शासकीय कर्मचारी अधिकारी आयएएस अधिकारी तसेच सरपंचापासून मुख्यमंत्र्यापर्यंत सर्वानी आपली मुले सरकारी, पालिका, जिल्हा परिषद् शाळामधे शिकण्यासाठी पाठवावीत. अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असे आवाहन भानुसे यांनी केले.
No comments:
Post a Comment