देशात सर्वाधिक 60 हजार तरुणांना ॲप्रेंटिसशिप - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 June 2016

देशात सर्वाधिक 60 हजार तरुणांना ॲप्रेंटिसशिप - मुख्यमंत्री

नवी दिल्ली, दि. 2 : राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमात महाराष्ट्राची कामगिरी लक्षणीय असून राज्य शासनाने  60 हजार तरुणांना ॲप्रेंटिसशिप मिळवून दिली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. याबाबत देशात ॲप्रेंटिसशिप कौन्सिल स्थापन करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय कौशल्य विकास अभियानाच्या नॅशनल गव्हर्निंग कौन्सिलची महत्वपूर्ण बैठक मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे झाली. कौशल्य विकास अभ्यासक्रमांचे राष्ट्रीय प्रमाणीकरण करण्यासाठी विविध उपायांबाबत चर्चा झाली. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. केंद्रीय मंत्री श्री. रविशंकर प्रसाद, राजीव प्रताप रुडी, कलराज मिश्र यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते.
            
देशात कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षणाशी समकक्ष असावे, जेणेकरुन देशातील तरुण जगात कुठेही रोजगार मिळविण्यासाठी सक्षम ठरु शकेल, या दृष्टीने यावेळी चर्चा झाली. केंद्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांशी या अभ्यासक्रमाची सांगड घालण्यात यावी,  ज्यायोगे तंत्रकुशल व्यक्तीला स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी प्राधान्याने कर्ज उपलब्ध होईल, असाही विचार यावेळी मांडण्यात आला, अशी माहिती श्री. फडणवीस यांनी दिली.
            
राष्ट्रीय कौशल्य विकास विद्यापीठाची निर्मिती करण्यात यावी, त्याच्या नियमावलीनुसार राज्यांतही कौशल्य विकास विद्यापीठे निर्माण व्हावीत. ही विद्यापीठे राष्ट्रीय विद्यापीठाशी संलग्न असावीत, अशीही चर्चा यावेळी झाली. कौशल्य विकासाचा अभ्यासक्रम हा राज्यातील अभ्यासक्रम निर्मिती मंडळाच्या अभ्यासक्रमांशी समकक्ष केल्यानंतर तरुणांचा शिक्षणाचा कालावधी कमी होऊ शकेल, अशीही चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad