महायुती सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाने 6 महिन्यात 1337 कोटी कमवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 June 2016

महायुती सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाने 6 महिन्यात 1337 कोटी कमवले

जमा निधी शेतकऱ्याना मोफत बियाणे/खते देण्यासाठी वापरावा 
मुंबई । अजेयकुमार जाधव / 6 June 2016 भाजपा शिवसेना युती सरकारने दुष्काळी स्थितीचा "सामना" करण्यासाठी पेट्रोल व डिझेलवर प्रति लीटर 2 रुपये दुष्काळ कर लावला होता. त्यापोटी, ऑक्टोबर 2015 ते मार्च 2016 या काळात 1,337 कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले. त्यात 465 कोटी 34 लाख डिझेल खपापोटी 930 कोटी 69 लाख तर 230 कोटी 35 लाख लिटर पेट्रोल विक्रीतून 406 कोटी 70 लाख रुपये जमा झाले असल्याची आकडेवारी माहिती अधिकार कार्यकर्ते धीरेंद्र पाटील यांना विक्रीकर विभागाकडून देण्यात आलेली आहे. 

माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर मध्ये 70.71 करोड लिटर डिझेल विक्री झाली असून त्यामधून 141.42 करोड रुपये, नोव्हेंबर मध्ये 75.89 करोड लिटर डिझेल विक्री झाली असून त्यामधून 151.78  करोड रुपये , डिसेंबर मध्ये 73.40 करोड लिटर डिझेल विक्री झाली असून त्यामधून  146.81 करोड रुपये, जानेवारी मध्ये 82.11 करोड लिटर डिझेल विक्री झाली असून त्यामधून 164.22 करोड रुपये, फेब्रुवारी मध्ये 82.81 करोड लिटर डिझेल विक्री झाली असून त्यामधून 165.22 करोड रुपये, मार्च  मध्ये 80.62 करोड लिटर डिझेल विक्री झाली असून त्यामधून 161.24 करोड रुपये असे सहा महिन्यात एकूण 465.34 करोड लिटर डिझेल विक्रीतून 930.69 करोड रुपये कर जमा झाला आहे.   

पेट्रोल ऑक्टोबर मध्ये 33.73 करोड लिटर पेट्रोल विक्री झाली असून त्यामधून 67.45 करोड रुपये, नोव्हेंबर मध्ये 33.60 करोड लिटर पेट्रोल विक्री झाली असून त्यामधून 67.90 करोड रुपये, डिसेंबर मध्ये 33.21 करोड लिटर पेट्रोल विक्री झाली असून त्यामधून 66.41 करोड रुपये, जानेवारी मध्ये 35.07 करोड लिटर पेट्रोल विक्री झाली असून त्यामधून 70.14 करोड रुपये, फेब्रुवारी मध्ये 34.58 करोड लिटर पेट्रोल विक्री झाली असून त्यामधून 69.16 करोड रुपये, मार्च मध्ये 33.17 करोड लिटर पेट्रोल विक्री झाली असून त्यामधून 66.34 करोड रुपये असे सहा महिन्यात एकूण 203.35 करोड लिटर पेट्रोल विक्री झाली असून त्यामधून 406.70 करोड रुपये कर जमा झाला आहे. 

राज्य सरकारने ऑक्टोबरपासून दुष्काळ कर म्हणून जमा केलेला 1337 करोड रुपयांचा निधी कुठे खर्च केला याची माहिती धीरेंद्र पाटील यांना देण्यात आलेली नाही. राज्य सरकारने दुष्काळ कारच्या नावाने कर लावून जमा केलेला कर कुठे खर्च केला याची माहिती दिली गेली नसल्याने सरकारने दुष्काळ कराचा पैसा कुठे खर्च केला याची माहिती जाहीर करावी, राज्य सरकारने दुष्काळ करमधून जमा झालेला निधी शेतकऱ्याना मोफत बियाणे /खते  देण्यासाठी वापरावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते धीरेंद्र पाटील यांनी केली आहे. 

हि तर राज्यातील जनतेची फसवणूक - धनंजय मुंडेदुष्काळ ग्रस्ताच्या मदतीसाठी पेट्रोल डिझेल वर 2 रु प्रति लिटर कर आकारून करोडो रुपये जमा करणा-या सरकारने या निधीचा उपयोग दुष्काळग्रस्तांसाठी न करून राज्यातील जनतेची  फसवणूक केली असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. दुष्काळ ग्रस्तांसाठी जमा केलेले 1300 कोटी रु कुठे गेले असा सवाल उपस्थित करून या पैशाचा हिशोब राज्यातील जनतेला द्यावा अशी मागणी हि त्यांनी केली आहे. या निधीमधून राज्यातील शेतक-याना खरीप हंगामासाठी मोफत बी बियाणे व खते घेण्यासाठी मदत करावी अशी मागणी हि त्यांनी केली आहे

ऑक्टोबर 2015 ते मार्च 2016 पर्यंत 1337 कोटी प्राप्त झाले. राज्याच्या तिजोरीतून शेतकऱ्यांसाठी 6500 कोटी खर्च केले. - सुधीर मुनगंटीवार

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad