मुंबई / प्रतिनिधी 24 June 2016 - मुंबईत गुरूवार रात्री पासून पडणाऱ्या पावसामुले 5 जण जखमी झाले आहेत. 41 झाडे पडली असून बेस्टची वाहतूक 40 मिनिटे वळवण्यात आली होती.
गुरुवारी रात्री 8 पासून शुक्रवारी सकाळी 8 पर्यंत कुलाबा येथे 24 मिमी तर सांताक्रुझ येथे 36.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी सकाळी 7.58 वाजता भायखळा एन एम जोशी मार्ग येथील गोमती चाळी मधील खोली क्रमांक 14 चा किचनचा काही भाग कोसळला. यात लिलाबेन वय 44 वर्षे व भरत कुमार पांचाळ वय 48 वर्षे हे दोघे जखमी झाले आहेत. 3 ठिकाणी शोर्टसर्किटच्या घटना घडल्या असून 22 ठिकाणी झाडे कोसळली.
शुक्रवारी सकाळी 8 पासून सायंकाळी 4 पर्यंत कुलाबा येथे 18.4 मिमी तर सांताक्रुझ येथे 17.4 मिमी पावसाची नोंद झाली. यावेळी 3 भिंत पडण्याच्या घटना घडल्या. केइएम रुग्णालयातील जुन्या इमारतीमधील मेट्रन कार्यालयातील छताचा स्ल्याब कोसळला यामधे सुजाता वाघ (57) व मिनाक्षी राऊळ (47) या दोन मेट्रन जखमी झाल्या. तर कूपर रुग्णालयाजवळ सायंकाळी 4. 46 मिनिटाने एका रिक्षावर झाड कोसळून त्यामधील मुलायम सिंग (38) जखमी झाला आहे. हिंदमाता परिसरात पावसाचे पाणी साचल्याने दुपारी 3.50 ते सायंकाळी 4.30 पर्यंत हिंदमाता परिसरातील वाहतूक उड्डाण पुलावरून वळवण्यात आली होती.
No comments:
Post a Comment