मुंबई / प्रतिनिधी / 16 June 2016 - मुंबई महापालिका एकीकडे दरवर्षी हजारोंच्या संख्येने वृक्षारापण करते तर दुसरीकडे याच महापालिकेच्या वृक्षप्राधिकरणामार्फत शहर व उपनगरातील बहुतांश इमारतीच्या विकास कार्याआड येणाऱया हजारो झाडांची कत्तल करण्याची परवानगी इमारत मालक व विकासकांना दिली जाते. 17 जून रोजी वृक्षप्राधिकरण समितीची बैठक आहे. या बैठकीत 400 वृक्षांची कत्तल करण्याबाबतचे 54 प्रस्ताव मंजुरीसाठी आले.
तसेच 519 वृक्षांच्या मुळ जागेवरून हटवून त्यांचे पर्यायी जागेत पुर्नरोपण करण्याबाबतचाही उल्लेखही प्रस्तावात आहे मात्र, पुर्नरोपीत वृक्ष फारच कमी प्रमाणात जगतात म्हणजेच पुर्नरोपीताच्या नावाखाली काही वृक्षांचा बळी जातो.
मात्र कापण्यात येणारे वृक्ष व पुर्नरोपीत वृक्षांचे पुढे काय कापलेल्या वृक्षांची बदली पर्यायी वृक्षारोपण केले जाते का ? तसे वृक्ष जगतात का? पुर्नरोपीत वृक्ष जगतात का मरतात ? त्यांची देखभाल, देखरेख वा पाठपुरावा कोण करते ? असा प्रश्नही उभा राहतो.
इमारतीच्या विकासा आड येणाऱया वृक्षांच्या कत्तलीला वृक्षप्राधिकरण साधक-बाधक चर्चेसही मंजुरी देते. मात्र बेसुमार वृक्षतोडीमुळे व नैसर्गिक जंगल हटवून विकासाच्या नावाखाली सिमेंटचे जंगल निर्माण केले आहे त्यामुळेच पर्यावरण धोक्यात आले आहे. गतवर्षी व 2009 साली मुंबईत व तलाव क्षेत्रात कमी पाऊस पडला. परिणामी तलावात कमी पाणी साठा होऊन मुंबईकरांना पाणी कपातीला तोंड द्यावे लागते.
17 जून रोजीच्यावृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत इमारत बांधकामाआड येणाऱया 400 वृक्षांची कत्तल करण्याबाबतचे प्रस्ताव मंजुरीस येणार आहेत यामध्ये 519 वृक्षांचे पुर्नरोपण करण्याचे प्रस्तावही अंर्तभूत आहेत. इमारतींच्या विकासाआड येणाऱया वृक्षांची संख्या अधिकाअधिक असून यामध्ये काही वृक्ष नाला, रस्ता रुंदीकरणाआड येणारेही आहेत. हे वृक्षही हटवण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment