मुंबई / प्रतिनिधी
भांडुप येथील बी पी एस पुल नजीक नागोरी हॉटेल येथे असणाऱ्या नाल्यात पडून एका 65 वर्षीय महिलेचा मुर्त्यु झाल्याची घटना शनिवारी सांयकाली घटली होती. या महिलेला रविवारी सांयकाली बाहेर काढून राजावाड़ी रुग्णालयात आणले असता तीला मृत घोषित करण्यात आले. महिलेचे नाव सुलोचना भालेराव असे आहे.
तर रविवारी सांयकाली वर्सोवा बीच येथील समुद्र किनार्यावर 4 जण बूड़त होते. यावेळी तेथील जीव रक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानानी त्यांना सुरक्षित बाहेर काढून उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची नावे मनीष आर्या, 43 वर्ष, निर्लेप आर्या, 11 वर्ष, शरयु आर्या, 40 वर्ष, चिराग आर्या, 22 वर्ष, असे आहेत.
दरम्यान आज पडलेल्या पावसात शहरात एका ठिकाणी शॉर्ट सर्किटची घटना घडली. तर 19 ठिकाणी झाडे पडले आहेत. एकूण 6 ठिकाणी घरच्या भिंतीचा भाग पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून या सर्व घटना मध्ये कोणी जखमी झालेले नाही. पूर्व उपनगरात 2 ठिकाणी आणि पश्चिम उपनगरात 8 ठिकाणी पाणी तुंबले.
No comments:
Post a Comment