मुंबई / प्रतिनिधी दि. २१ जून - मुंबईमधील रस्ते घोटाळ्या प्रकरणी मंगळवारी कंत्राटदाराकडे साईट इंजीनिअर म्हणून काम करणार्या 3 अभियंत्याना आझाद मैदान पोलिस ठाण्याने अटक केली आहे. रस्ते घोट़ाळ्यात अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता 22 झाली आहे.
मुंबई रस्ते घोटाळयाची चौकशी पालिकेने नेमणूक केलेल्या समिती ने केल्यावर आझाद मैदानात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी 10 खाजगी कंपनी मधील लेखापाल, कंत्राटदाराकड़े काम करणारे 9 अभियंत्याना अटक केली आहे. मंगळवारी दुपारी पोलिसांनी महावीर रोड्स इंफ्रा कंपनीत काम करणार्या दत्तात्रय धस (26), जे कुमार के.आर. कंस्ट्रक्शन कंपनीत काम करणार्या आशीष जैसवाल (27) तसेच जे कुमार के आर कंस्ट्रक्शन कंपनीमधे काम कारणार्या ऋषिकेश शिंदे (23) या 3 साईट इंजीनिअरना अटक केली आहे.
No comments:
Post a Comment