मुंबई / प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेचे क्रूड ऑइलचे जकातीमधून मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे यामुले पालिकेच्या उत्पन्नावर मोठा फरक पडला. या घटलेल्या उत्पन्नातून मार्ग काढण्यासाठी पालिकेने नेमलेल्या नव्या टास्क फ़ोर्स द्वारे जकात नाक्यावरून आता दिवसाला 2 कोटी रुपयांची जकात वसूली होऊ लागली आहे.
या टास्क फ़ोर्स मधे पालिकेचे 6-7 कर्मचारी अधिकारी असतात. याना जकात वसूलीचे टार्गेट दिले जाते. हे टार्गेट वेळेवर पूर्ण झाले तर त्यांच्या जागी दुसर्या कर्मचारी अधिकारी यांची नेमणूक केली जाते. टार्गेट पूर्ण न झाल्यास संबधित टास्क फ़ोर्सला त्याच ठिकाणी कार्यरत राहावे लागते असे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले आहे.
या टास्कफ़ोर्स सोबतच सीसीटीव्ही आणि वाहतूक कोंडीवर मिळवलेल्या नियंत्रणामुलेही जकात वसूली वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. क्रूड ऑइलच्या जकातीचे उत्पन्न 2014 - 2015 मध्ये 36 टक्क्यांनी उत्पन्न घसरले होते. यामुळे जकातीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. तरी 2015-2016 या वर्षी जकात वसुलीचे लक्ष 6500 कोटी रुपये ठेवण्यात आले. इतके लक्ष साध्य करण्यासाठी जकात नाक्यावर सीसीटीव्ही यंत्रणे सोबत टास्क फोर्सची नेमणूक करण्यात आली. या टास्क फोर्सने जकातीच्या उत्पन्न वाढण्यास मोठा हातभार लागला. तसेच जकात चोरी करणारे वाहन पकडण्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
क्रुड ऑइल पासून मिळणारे जकात उत्त्पन्न घटले तरी जकात नाक्यावर करण्यात आलेल्या विविध उपाय योजनामुले सन 2015-16 मधे 6200 कोटी रुपयांची जकात वसूली होतानाच दिवसाला दिड ते दोन कोटी रुपयांची जकात वसूली होत असल्याचे मुखर्जी यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment