महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२६ अंतर्गत 2५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 يونيو 2016

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२६ अंतर्गत 2५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

मुंबई, दि. १०  : महाराष्ट्र शासनाने १० वर्षे मुदतीचे 2५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले असून ही विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधिन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल.


शासकीय रोख्यांची विक्री भारतीय रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट शाखेच्या वतीने दि. २० जुलै २००७ च्या सुधारित सर्वसाधारण अधिसुचनेतील कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येईल. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसुचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.                              

भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक १४ जून  २०१६ रोजी त्यांच्या फोर्टमुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक  १४ जून २०१६ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाची आहेत.
            
यामध्ये स्पर्धात्मक बिडस संगणकीय प्रणालीद्वारा,रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत सादर करावेत.
अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारारिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.३० पर्यंत सादर करावेत.
लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकमुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक १५ जून २०१६ रोजी करण्यात येईल.

यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक १५ जून  २०१६ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाफोर्टमुंबई यांच्या कार्यालयात रोखीने बँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्यांचा कालावधी दहा वर्षांचा असेल. रोख्यांचा   कालावधी  दि. १५ जून  २०१६ पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक ९ मार्च २०२६  रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल.
            
अधिकतम प्राप्तीचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दर साल दर शेकडा कूपन दराएवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक  १५ डिसेंबर आणि १५ जून रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.
            
शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे रोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील अशी माहिती वित्त विभागाच्या  १० जून २०१६  रोजीच्या अधिसुचनेत नमूद करण्यात आली आहे

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Post Bottom Ad